Joke of the day : पप्पू जेव्हा मित्राला स्वत:च्या बायकोचं टोपण नाव सांगतो…




Viral Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

1.बंड्या आणि पप्पूच्या कौटुंबिक गप्पा सुरू असतात...

बंड्या : अरे, तू बायकोला कोणत्या नावानं बोलावतोस?

पप्पू : गुगल डार्लिंग

बंड्या : हे कसलं नाव?

पप्पू : काय करू यार? एक प्रश्न विचारला तर १०० उत्तरं देते!

बंड्यानं पप्पूचे पाय धरले!

...

2.संत्या प्रवासातून थकून आलेला असतो. तितक्यात त्याला पिंट्या भेटतो...

संत्या : यार, काय सांगू रात्रभर जागरण झालं. ट्रेनमध्ये झोपच नाही आली. वरची सीट मिळाली होती. उकडत होतं जाम

पिंट्या : अरे मग सीट बदलून घ्यायची ना. खालच्या माणसाला वर झोपायला सांगायचं होतंस

संत्या : कशी बदलणार यार? खालच्या सीटवरचा माणूसच आला नव्हता

संत्याचं उत्तर ऐकून पिट्यानं कल्टी घेतली!

 

(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

Comments

Popular posts from this blog