बॉसच्या जोकवर जेव्हा बंड्या हसत नाही…

 बॉसच्या जोकवर जेव्हा बंड्या हसत नाही…


Viral Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

1.बॉसच्या जोकवर संपूर्ण टीम हसली, पण बंड्या हसला नाही!

बॉससाठी हा धक्का होता. त्यानं न राहवून बंड्याला विचारलंच...

बॉस: तुला माझा जोक समजला नाही का?

बंड्या : सर, माझं दुसऱ्या कंपनीत सिलेक्शन झालंय

बॉसनं मिटिंग अर्ध्यातच कॅन्सल केली!

...

2.पिंट्या आणि संत्या गप्पा मारत असतात...

संत्या : यार पिंट्या, मुलींचं बरं असतं... लग्नाच्या आधी बाबाची लाडकी असते आणि लग्नानंतर घरची लक्ष्मी असते

पिंट्या : आणि मुलांचं काय?

संत्या : मुलांचं कसलं आलंय? लग्नाआधी बाबांचा मार खातात, लग्नानंतर बायकोचा

पिंट्यानं संत्याचे पाय धरले…

 

(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

Comments

Popular posts from this blog